Top
This website is best seen at 1024px X 768px resolution in Internet explorer 7 or above.

Please update your browser to any latest version. or shift to Chrome, Firefox, Opera.

घावन (तांदळाचे)

साहित्य – १) तांदळाचे बारीक पीठ (तांदूळ धुवून त्याचे पीठ करावे), २) पाणी, मीठ, ३) गोडे तेल, ४) भिडाचा तवा अगर डोश्याचा तवा, ५) नारळाचा गोड रस. कृती – तांदळाच्या पिठात पाणी घालून साधारण पिठल्यासारखे पीठ करून ठेवावे. नंतर १/२ तासानंतर त्यात पाणी घालून ते पातळ करावे. ताकाइतपत पातळ करावे. नंतर तव्याला तेल फासावे व त्यावर घावन घालावा व सर्व बाजूंनी उचलला की काढून घ्यावा. हे घावन नारळाच्या रसाबरोबर खातात. किंवा दुधात गूळ व वेलची घालून त्याच्याबरोबर खातात. सूचना – १) तांदूळ भिजत घालूनही घावन करतात त्यासाठी सकाळी तांदूळ भिजत घालतात व दुसर्‍यादिवशी ते बारीक वाटून त्याचे घावन करतात. २) घावन तव्यावर परतून टाकून भाजू नयेत. एकाच बाजूने भाजावेत.

आपलं मत आमच्या पर्यंत पोहोचवा.