Top
This website is best seen at 1024px X 768px resolution in Internet explorer 7 or above.

Please update your browser to any latest version. or shift to Chrome, Firefox, Opera.

पत्रकार संघाचे दिवाळी अंक पुरस्कार प्रदान

मुंबई, दि. 11 (प्रतिनिधी) - होळीच्या पूर्वसंध्येला पत्रकार संघाने आयोजित केलेल्या `दिवाळी अंक स्पर्धा-2011’मधील विजेत्यांना होममिनिस्टर फेम आदेश बांदेकर यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आले. उत्कृष्ठ दिवाळी अंक संपादनाचे केशवराव कोठावळे स्मृतिचिन्ह पुरस्कार `तारांगण’ या दिवाळी अंकाचे संपादक मंदार जोशी यांना बहाल करण्यात आला.

स्पर्धेत उत्कृष्ठ दिवाळी अंकांची निवड करण्यात आली. यासाठी परीक्षक म्हणून सर्वश्री माधव हरि रानडे, श्रीकांत नाईक तसेच सुनील धोपावकर (मुखपृष्ठ परीक्षक) यांनी काम पाहिले आणि माधव रानडे यांनी परीक्षकांच्या वतीने स्पर्धेसंबंधात निवेदन सादर केले.

उत्कृष्ठ अंकाचे `दीनानाथ दलाल स्मृतिचिन्ह’ `साहित्य’ने पटकावले, तर उत्कृष्ठ अंकाचे `अनंत अंतरकर स्मृतिचिन्ह’ `महा अनुभव’ला देण्यात आले. उत्कृष्ठ अंकाचे `रत्नाकर देसाई स्मृतिचिन्ह’ `आपले छंद’, उत्कृष्ठ अंकाचे `इंदुमती चिटणीस स्मृतिचिन्ह’ `बाल मैफल’ला देण्यात आले. उत्कृष्ठ विनोदी साहित्याचे `मधुकर पाटकर आवाज स्मृतिचिन्ह’ भालचंद्र देशपांडे यांना `ऑल दि बेस्ट’ या दिवाळी अंकामधील `मोलकरीन डॉट कॉम’ या लेखासाठी देण्यात आले. उत्कृष्ठ कादंबरी `चंद्रकांत भोगटे स्मृतिचिन्ह’ निळू दामले यांना `चंद्रकांत’ या दिवाळी अंकातील त्यांच्या `थीज’ या कादंबरीसाठी देण्यात आले आहे.

तसेच उत्कृष्ठ हास्यचित्राचे `शं.वा. किर्लोस्कर स्मृतिचिन्ह’ एस.ए. मुलाणी यांना `अधिष्ठान’ या दिवाळी अंकातील हास्यचित्र मालिकेसाठी देण्यात आले. उत्कृष्ठ मुखपृष्ठाचे `रघुवीर मुळगावकर स्मृतिचिन्ह’ चंद्रमोहन कुलकर्णी यांना `महा अनुभव’ या दिवाळी अंकाच्या मुखपृष्ठासाठी देण्यात आले आहे.

पुरस्कार वितरण सोहळा पत्रकार संघाच्या सभागृहात पार पडला. या कार्यक्रमास पत्रकार संघाचे अध्यक्ष देवदास मटाले, पत्रकार शशिकांत सांडभोर आणि पत्रकार प्रभाकर राणे आदी मान्यवर उपस्थित होते.

आपलं मत आमच्या पर्यंत पोहोचवा.