Top
This website is best seen at 1024px X 768px resolution in Internet explorer 7 or above.

Please update your browser to any latest version. or shift to Chrome, Firefox, Opera.

पणती आहे की…

`पहिली बेटी धनाची पेटी’ अशी आपल्याकडे म्हण आहे. पण प्रत्यक्षात मात्र बेटी जन्माला येणार हे कळताच तिला जन्मापूर्वीच मारून टाकरण्यात येते. मग ती बेटी पहिली असो वा दुसरी डोक्यात फक्त मुलगी नको एवढेच असते. त्यामुळे शासन आणि प्रसारमाध्यमांनी मुलगा-मुलगी समानतेचे प्रबोधन करण्याची जोरदार मोहीम राबविली. तरी समाजातल्या सर्व स्तरांपर्यंत हा विषय पोहोचलेला नाही. खेडय़ापाडय़ातच नव्हे तर उच्चभ्रू पांढरपेशा समाज आणि अगदी शहरी भागातही स्त्रीभूण हत्येसारखे लांच्छनास्पद कृत्ये सर्रास होताना आढळतात. आजही आपल्या समाजात अनेक ठिकाणी `मुलगी’ जन्माला येणे हे नापसंतीचे मानले जाते. त्यामुळेच त्रीभूण हत्या हे समाजासाठी एक शाप ठरत आहे. म्हणूनच या `स्त्रीभ्रूण हत्ये’सारख्या गंभीर विषयावर चित्रपटाच्या माध्यमातून त्यावर समाजाचे लक्ष वेधण्यासाठी निर्मात्या-दिग्दर्शिका कांचन अधिकारी `दहा डिसेंबर’ हा चित्रपट घेऊन येणार आहेत.

आजच्या कॉम्प्युटरायजेशनच्या जमान्यात स्त्री-पुरुष भेदभाव करणेच चुकीचे आहे. चूल आणि मूल यात अडकलेली स्त्री कधीच या जोखडामधून पुढे गेली असली तरी समाजाची मानसिकता मात्र काही केल्या बदलायला तयार नाही. यातूनच स्त्रीभूण हत्येसारखी कृत्ये घडताना दिसतात. याच मानसिकतेला बदलू पाहण्यासाठी कांचन अधिकारी यांनी हा विषय वेगळ्या पद्धतीने हाताळीत आहेत. या सिनेमाची कथा एका मध्यमवर्गीय कुटुंबाभोवती गुंफण्यात आली आहे. या कुटुंबाला बांधून ठेवणारी सावित्री आपल्या तीन मुली आणि नवरा यांच्यात स्वतःला हरवून बसली आहे. नायिका सावित्रीचे पत्नी आणि आई या दोन नात्यातली हळूवार भावनिक बंध या चित्रपटात पाहायला मिळणार आहेत. प्रतीक्षा लोणकर, शरद पोंक्षे, मोहन जोशी, मृण्मयी देशपांडे, नेहा गद्रे, सुशांत शेलार, ऐश्वर्या तुपे या कलाकारांच्या यात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. `दहा डिसेंबर’ या एका तारखेभोवती घडणारी चित्रपटाची कथा-संवाद दिग्दर्शिका कांचन अधिकारी यांनी लिहिली असून पटकथा लेखा त्रैलोक्य यांची आहे. सौमित्र (किशोर कदम) यांच्या भावस्पर्शी गीतांना मिलिंद इंगळे यांनी संगीताची साथ दिली आहे. तर सिनेमॅटोग्राफर शेखर अण्णा हे चित्रपटाचे छायाचित्रण करणार आहेत.

`पूर्वी आपल्याकडे बालविवाह, सतीची चाल असल्या अनिष्ठ रुढी होत्या. त्या कालांतराने बंद झाल्या मात्र ही त्रीभूण हत्येचा प्रकार खूप भयानक आहे आणि ही हत्या बंद व्हावी यासाठी सरकारने किती काही केले तरी लोकांचे विचार बदलता येणार नाही. त्यामुळे मुळात लोकांची त्रीकडे पाहण्याची दृष्टी बदलली पाहिजे. तरच हे त्रीभूण हत्येचे प्रकार थांबतील. त्री ही आपल्या वंशाचा दिवा असू शकत नाही, ती आपल्या मृतदेहाला अग्नी देऊ शकत नाही हा समज जोपर्यंत समाज मनातून जात नाही तोपर्यंत त्रिया या समाजात मोकळा श्वास घेऊ शकणार नाहीत. त्यासाठी येथे मानसिक उठाव झाला पाहिजे. एक मुलगी अगदी मुलाप्रमाणे घर चालवू शकते, आई-वडिलांची जबाबदारी एकटी पेलू शकते हेच या `10 डिसेंबर’मध्ये दाखविले आहे. त्यामुळे जर मुलगी असून सर्व जबाबदार्या पार पाडू शकते तर वंशाचा दिवाच कशाला पाहिजे पणती आहे की, घरात उजेडासाठी हाच संदेश या चित्रपटातून द्यायचा आहे’, असे निर्मात्या-दिग्दर्शिका कांचन अधिकारी यांनी सांगितले. `मानसी मुव्ही’ निर्मिती संस्थेच्या या चित्रपटाची निर्मिती भाऊसाहेब भोईर आणि कांचन अधिकारी हे मिळून करणार आहेत. परभणीत घडलेल्या सत्यघटनेवर अनुराधा वैद्य लिखित `चौफुला’ कांदबरीवर `दहा डिसेंबर’ ची कथा बेतली आहे. या चित्रपटाचा मुहूर्त नुकताच मुंबईत दिग्दर्शक मधुर भांडारकर आणि कलादिग्दर्शक नितीन देसाई यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी राजा राणी ट्रव्हल्सयचे अभिजीत पाटील तसेच संस्कृती कलादर्पणच्या कार्याध्यक्षा अर्चना नेवरेकर हे उपस्थित होते. या महिन्याच्या अखेरीस या सिनेमाचे चित्रीकरण पूर्ण करून जुलै-ऑगस्ट दरम्यान हा चित्रपट प्रदर्शित करण्यात येणार आहे.

आपलं मत आमच्या पर्यंत पोहोचवा.