Top
This website is best seen at 1024px X 768px resolution in Internet explorer 7 or above.

Please update your browser to any latest version. or shift to Chrome, Firefox, Opera.

पतंजली आयुर्वेद महाराष्ट्रात

मुंबई, दि. 29 (प्रतिनिधी)-बाबा रामदेव यांच्या पतंजली आयुर्वेदची सर्व उत्पादने महाराष्ट्रात उपलब्ध करून देण्यात आली आहेत. आपल्या आऊटलेटतर्फे 800 उत्पादने बाजारात आणण्यात येणार आहेत.

स्वामी बालकृष्ण यांनी सांगितले की, मुंबईसह महाराष्ट्रात पतंजली आयुर्वेदच्या विस्तारीकरणाची घोषणा केली. या वस्तूच्या विक्रीपासून मिळणारा नफा हा ग्रामीण भागात, जमीन अर्थव्यवस्था, आरोग्य व आत्मनिर्भरतेसाठी खर्च केला जाणार आहे. पतंजली ग्राम निर्माण मॉडेल तयार करणार असून त्यासाठी कॉर्पोरेट मदतीची गरज पडणार आहे.

कंपनीचे पतंजली केंद्र तीन हजारांपेक्षा अधिक लोकसंख्येच्या गावात स्थापन करण्यात येणार आहे. बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या उत्पादनापेक्षा याच्या किंमती 30 टक्के कमी राहणार आहेत.

आपलं मत आमच्या पर्यंत पोहोचवा.