Top
This website is best seen at 1024px X 768px resolution in Internet explorer 7 or above.

Please update your browser to any latest version. or shift to Chrome, Firefox, Opera.

सरकार आणि रिझर्व्ह बँक रुपयाला सावरण्यासाठी प्रयत्नशील

नवी दिल्ली, दि. 7 - घसरत्या रूपयाला सावरण्यासाठी केंद्र सरकार आणि रिर्झव्ह बँक ऑफ इंडिया प्रयत्नशील आहे. आगामी काळात घसरण रोखण्यासाठी पुन्हा उपाययोजना केल्या जातील असे आश्वासन अर्थमंत्री पी.चिदंबरम यांनी काल दिले. केंद्र सरकारचे डॉलरच्या तुलनेत रूपयाच्या होणार्या घसरणीवर लक्ष आहे. निर्यात वाढविण्यासाठी आणि आयात कमी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. जागतिक बाजारातील अस्थिरत आणि काही देशांतर्गत कारणांमुळे रूपया घसरत आहे.

तरलता निर्माण करून रूपयाची घसरण रोखता येऊ शकते असे उत्तर चिदंबरम यांनी राज्यसभेच्या सदस्यांना दिले.

आपलं मत आमच्या पर्यंत पोहोचवा.