Top
This website is best seen at 1024px X 768px resolution in Internet explorer 7 or above.

Please update your browser to any latest version. or shift to Chrome, Firefox, Opera.

गणित वर्षः २०१२

ख्यातनाम गणिततज्ज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त २०१२ हे वर्ष राष्ट्रीय गणित वर्ष म्हणून साजरे होणार असल्याची घोषणा नुकतीच करण्यात आली. यानिमित्ताने आज गणित या विषयात उपलब्ध होत असलेल्या संधी आणि गणितात असलेल्या करिअरविषयी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राजन वेळूकर यांचे मनोगत…गणित वर्ष साजरा करण्यामागची नेमकी भूमिका म्हणजे आज देशाला गणिताची मोठी आणि वैभवशाली परंपरा आहे आणि या वैभवशाली परंपरेला उत्तेजन देण्यासाठी या वर्षात प्रयत्न करण्यात येतील तसेच गणित या विषयाबद्दल मुलांच्या मनात असलेली अढी दूर करावी याबाबतही प्रयत्न करण्यात येतील. आज आपण २१ व्या शतकात जे गणित शिकतो आहे. आज प्रत्येक विषयात मग तो मानसशास्त्र असो किंवा राज्यशास्त्र असो किंवा जीवशास्त्र, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र असो, या सगळ्यांमध्ये गणिताचा वापर होतो.

आज जगातील प्रत्येकाला गणित कुठे ना कुठे वापरावे लागते आणि म्हणूनच त्याला जेनेरीक सॉफ्ट स्किल्स येणे आवश्यक आहे. व्यवहारासाठी तसेच आजच्या लाईफस्टाईलमध्ये घेण्यासाठी प्रत्येकाला गणित येणे आवश्यक असल्याने आज गणिताला महत्त्व प्राप्त झाले आहे.

गणिताबाबत आणि गणित या विषयात उपलब्ध असणार्या संधीबाबत बोलायचे तर, आज जगाला झपाट्याने पुढे घेऊन जाण्यात, विज्ञानामध्ये प्रगती होण्यात  महत्त्वाची भूमिका कोणी बजावली आहे तर ती गणिताने. विज्ञानाला पुढे नेण्यात, आपले तंत्रज्ञान विकसित करण्यात, जीव, भौतिक आणि रसायनशास्त्रामध्ये नवनवीन शोध घेण्यातही गणिताची महत्त्वाची भूमिका आहे आणि म्हणून एकंदरीत गणिताचा इतिहास, गणिताचा उपयोग आणि गणिताचे गेल्या १०० वर्षात वाढलेले महत्त्व या २०१२ या वर्षाच्या निमित्ताने पुढे येण्यास मदत होणार आहे.

आज गणितात फुलटाईम करिअर करता येऊ शकते आणि गणितात उपलब्ध असलेली संधी पाहिली की, आज जरी भारत विज्ञानात पुढे असला तरी कोणत्याही विज्ञानात गणिताची आवश्यकता असल्याने गणिततज्ज्ञ तर लागतातच याशिवाय गणित विषय शिकविणारे शिक्षक आणि प्राध्यापक याबरोबरच आज गणितामध्ये अनेक करिअरच्या संधी आहेत आणि त्याही फक्त भारतातच नाही तर संपूर्ण जगभरात म्हणजे आज आपल्याकडे ऍक्युचरीज सायन्स, बिझनेस ऍनालिस्ट, ऍप्लाईड मॅथेमॅटिक्स, फॉरीन ऍन्लॉसिस, इकोलॉजिस्ट, कॉम्प्युटर सायन्स, बायो मॅथेमॅटिक्स, क्रिस्टोलॉजिस्ट तसेच स्पेस रिसर्चर इस्त्रो, ऍरोनॉटिक्स या सगळ्या ठिकाणी गणिततज्ज्ञाची गरज लागते. याशिवाय आयबीएम, सेबी यासारख्या ठिकाणी तर फायनान्शियल ऍनालिस्ट, कॉम्प्युटर आणि टेक्निकल सायंटिस्ट म्हणूनही आज करिअरची संधी उपलब्ध आहे. आज गणित विषयात मास्टरी असणार्यांची आवश्यकता अशासाठी आहे की, आज भारतामधले आपले रिसोसॅस कमी झाले आहे, त्यात दिवसेंदिवस लोकसंख्या वाढते आहे.

त्यात जागतिक हवामान बदल होत असताना या सर्व परिस्थितीचा नेमका अहवाल तयार करणे यासाठीही गणिततज्ज्ञांची फार मोठी गरज आहे. गणित हा विषय जर तुम्हाला नेमका सांगायचा असेल तर, ‘‘मॅथेमॅटिक्स इज ऑफ इफिशियंट ऍण्ड नेसेसरी टुल बिंग एप्लॉईड बाय ऑल सायन्सेस’’ (Mathematics is of efficient and neccesary tool being employed by all sciences) याचाच सोपा अर्थ असा आहे की, आज दैनंदिन जीवनातसुद्धा आपल्याला गणिताची आवश्यकता असते. अगदी आपल्यापैकी प्रत्येक जण कोणत्याही गोष्टीचे कॅलक्युलेशन करतच असतो म्हणजे अगदी लहान मूलसुद्धा तिथून इथपर्यंत पोहोचायचे तर त्याला किती पावले टाकावी लागतील याचा विचार करतो. तर आपल्यापैकी कोणाला विरारहून चर्चगेटला जायचे असेल तर किती वेळ लागेल याचा आपण विचार करतो याचा अर्थ प्रत्येकाला गणित लागतेच. मी या निमित्ताने एकच सांगेन की, आज मोठमोठ्या कॉर्पोरेट कंपन्या, बँकिंग क्षेत्र, शास्त्रज्ञ संस्था येथे गणित हाच विषय घेतलेल्यांना करिअरच्या संधी आहेत. याशिवाय गणितामध्ये ऍडव्हायझरी पोझिशन, रिसर्च फेलोशिप, टेक्निकल रायटर अशा करिअरच्या संधी आहेत त्यामुळे मी असेच सांगेन की, गणित या विषयाविषयी कोणतीही मनात अढी ठेवू नका. कारण मुळातच हा विषय अजिबात कठीण नाही आणि जर तुम्ही या विषयाशी मैत्री केलीत तर गणित येणं हे एकदम आनंददायी होईल. म्हणून या विषयाशी जवळीक करा आणि गणिताला आपलेसे करा असे मी म्हणेन.

- डॉ.राजन वेळूकर
(कुलगुरु मुंबई विद्यापीठ)

आपलं मत आमच्या पर्यंत पोहोचवा.