Top
This website is best seen at 1024px X 768px resolution in Internet explorer 7 or above.

Please update your browser to any latest version. or shift to Chrome, Firefox, Opera.

मुंबई

sharad rao

पालिका कर्मचारी, बेस्ट, रिक्षाचालकांचा नियोजित संप मागे

मुंबई, दि. 17 (प्रतिनिधी)- ऐन पावसाळ्यात मुंबई महापालिकेच्या तसेच बेस्टच्या कर्मचार्यांनी तसेच रिक्षाचालकांनी पुकारलेला नियोजित संप मागे घेण्यात आल्याची घोषणा कामगार नेते शरद राव यांनी आज संध्याकाळी केली. त्यामुळे आधीच मुसळधार पावसाने हैराण झालेल्या मुंबईकरांचा जीव भांडय़ात पडला आहे. पालिका कर्मचारी व रिक्षाचालकांच्या मागण्यांबाबत विचार करण्याचे आश्वासन राज्य सरकारने दिल्याने संप मागे घेत असल्याचे राव [...]


राज्य

पुण्यात पोलिस आणि दरोडेखोरांमध्ये चकमक

पुणे ,दि.17 (वार्ताहर) – शिवाजीनगर येथील मोदीबागेत दरोडय़ासाठी आलेल्या  कुख्यात दुधानी टोळीतील दरोडेखोर आणि पोलिसांमध्ये रविवारी पहाटे तीनच्या सुमारास चमकक झाली. ही चकमक सुरू असताना एक दरोडेखोर पोलिसांच्या हाती लागला तर सहाजण पसार झाले. या चकमकीमध्ये एक पोलिस अधिकारीही जखमी झाला आहे.


advertise

राष्ट्रीय

NITISH_KUMAR

विभक्त झाल्यानंतर भाजप-जदयूमध्ये सुरू आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी

पाटणा, दि. 17 (पीटीआय)- जनता दल(यु)ने गेल्या 17 वर्षांपासून भाजपशी असलेली युती तोडण्याचा निर्णय घाईत घेतलेला नाही. भाजपने आडमुठेपणाने निर्माण केलेल्या स्थितीमुळेच जदयू अखेर राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून बाहेर पडल्याचे बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी स्पष्ट केले.


आंतरराष्ट्रीय

भारतीयांनो व्हिसा संपताच `सौदी’चा घ्या निरोप

दुबई, दि. 17 (पीटीआय) – भारतीय नागरिकांनी आपल्या व्हिसाच्या मुदतीपेक्षा जास्त काळ सौदी अरेबियामध्ये राहू नये. कायदेशीर कारवाई टाळायची असल्यास `आपत्काल प्रमाणपत्र’ (इमर्जन्सी सर्टिफिकेट) मिळाल्यानंतर त्यांनी त्वरीत सौदीच्या बाहेर पडावे, असे रियाध येथील भारतीय दुतावासाने म्हटले आहे.


अर्थशक्ती

17edit_rbi

रेपो रेट,सीसीआरमध्ये बदल नाही

मुंबई, दि. 17 (वृत्तसंस्था) – रुपयाची घसरण, अन्नधान्य महागाईचा वाढता दर आणि जागतिक बाजारातील नकारात्मकता लक्षात घेऊन भारतीय रिझर्व्ह बँकेने आज पतधोरणाचा तिमाही आढावा घेताना रेपो रेट आणि सीआरआरमध्ये कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे व्याजदरात कुठलाही बदल होणार नसल्याने ईएमआयचं ओझं थोडं हलकं होण्यासाठी गृहकर्जदारांना आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे.


क्रीडा

sport_jaywardhane_3cl

श्रीलंकेचे कांगारुंना 254 धावांचे आव्हान

लंडन, दि. 17 (वृत्तसंस्था)- महेला जयवर्धनेच्या 81 चेंडूतील नाबाद 84 धावांच्या खेळीच्या जोरावर श्रीलंकेने ऑस्ट΄oलियासमोर पन्नास षटकांन 254 धावा काढण्याचे दमदार आव्हान ठेवले आहे. शेवटची बातमी हाती आली तेव्हा ऑस्ट΄oलियाने 5.2 षटकांत 2 गडी गमावून 45 धावा केल्या होत्या.


ठाणे

ठाण्यात पाणी साचले

ठाणे (वार्ताहर) – दोन दिवसांच्या काहीशा विश्रांतीनंतर ठाण्यात शनिवारी पुन्हा एका पावसाने दमदार हजेरी लावली आहे. सखल भागांमध्ये आणि नेहमीच्या भागांमध्ये पुन्हा एकदा साचायला सुरुवात झाली. विशेष म्हणजे सकाळपासून अचानक सुरु झालेल्या या पावसामुळे रेल्वे वाहतुकीवरही परिमाण जाणवला. मध्य रेल्वेच्या लोकल  25 ते 30 मिनिटे उशिराने धावत होत्या.


संपादकीय

6NITISH KUMAR KA PRESS CONFRENCE1

नितीश कुमारांची पळवाट

सर्वात लोकप्रिय नेते अशी मोदी यांची भारतीय जनता पक्षात ओळख झाली आहे. त्याला शह देणे शक्य नसल्याने भाजपशी काडीमोड ही नितीश कुमार यांनी काढलेली पळवाट आहे.


advertise